वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्मप्रसार करून आदर्श समाजच्या निर्मितीसाठी गुरुकृपायोगानुसार साधना शिकवणारी सनातन संस्था
१. स्थापना
आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना सन १९९९ (२२.३.१९९९) मध्ये केली.
२. श्रद्धास्थाने
आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे प्रेरणास्थान आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सद्गुरु इंदूरनिवासी संत प.पू. भक्तराज महाराज हे संस्थेचे श्रद्धास्थान आहेत. हिंदु धर्मातील सर्व देवता, धर्मग्रंथ, तीर्थस्थळे, संप्रदाय आणि संतमहंत यांच्याविषयी ‘सनातन संस्था’ पूज्यभाव बाळगते.
३. उद्देश
अ. जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून देणे आणि धर्मशिक्षण देणे.
आ. साधकांना वैयक्तिक साधनेविषयी मार्गदर्शन करून ईश्वरप्राप्तीपर्यंतची वाट दाखवणे.
इ. आध्यात्मिक संशोधन करणे आणि त्यातील निष्कर्षाद्वारे अध्यात्माचे महत्त्व सिद्ध करणे.
ई. अध्यात्मातील तात्त्विक (थेअरी) आणि प्रायोगिक भाग (प्रॅक्टिकल) शिकवणे.
उ. समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांद्वारे सर्वचदृष्ट्या आदर्श असलेले धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे.
४. वैशिष्ट्ये
१. विविध पंथियांना त्यांच्या पंथाप्रमाणे मार्गदर्शन !
२. संकुचित सांप्रदायिकता नव्हे, तर हिंदु धर्मातील व्यापक दृष्टीकोनानुसार शिकवण !
३. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या तत्त्वानुसार प्रत्येकाला आवश्यकता आणि क्षमता यांनुसार साधनाविषयक दिशादर्शन !
४. शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी सर्व योगमार्गांना सामावून घेणार्या ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गानुसार साधना !
५. वैयक्तिक साधनेबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी करायच्या साधनेची शिकवण !